प्राचार्य संदेश

संजय बारकुंड
प्राचार्य,पोलीस प्रशिक्षण केंद्र,
तुरची-तासगांव
ई-मेल: prin.ptcturachi@mahapolice.gov.in
ई-मेल:barkundsanjay@yahoo.in
ऑफिस फोन: 02346-232100
मोबाईल नंबर :- 9823511494

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिकचे दुरस्थ् पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणून 2011 पासून सुरू झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची-तासगांव या प्रशिक्षण केंद्रामधून आजपावेतो प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षक यांच्या 3 तुकडया व नवप्रविष्ठ् प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई यांची 1 तुकडी याप्रमाणे अनुक्रमे 802 प्रशिक्षणार्थी पोलीस उप-निरीक्षक व 400 नवप्रविष्ठ् प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई मुलभूत प्रशिक्षण घेवून प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडले आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रिद वाक्याप्रमाणे सक्षम, समर्थ व सौजन्यशिल पोलीस अधिकारी, कर्मचारी घडविण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्राकडील सर्व अधिकारी कर्मचारी कटिबध्द् आहेत.

प्रशिक्षणार्थींच्या मुलभूत प्रशिक्षणातील आंतरवर्ग व बाहयवर्ग प्रशिक्षण अभ्यासक्रम अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान व पध्दतींचा उपयोग करण्यात येत आहे. आंतरवर्गातील सर्व विषयांचे Content Development तयार करून मल्टीमिडीया एलसीडी प्रोजेक्टरद्वारे प्रत्येक वर्गामध्ये आधुनिक पध्दतीने अध्यापन करण्यात येत आहे. बाहयवर्ग प्रशिक्षणासाठी कवायत मैदान, स्पोर्टस् ग्राउंड, कमांडो ऑबस्टॅकल्स्, विविध खेळांची मैदाने याद्वारे उच्च् दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुसज्ज् ग्रंथालय, वाचनालय, करमणूक केंद्र, संगणक प्रशिक्षण केंद्र, इत्यादी द्वारे प्रशिक्षणार्थींच्या सर्वांगीण विकासासाठी व अष्टपैलू व्यक्तिमत्व् घडविण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री स्वर्गीय श्री. आर.आर.पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून उदयास आलेल्या या पोलीस प्रशिक्षण केंद्राची उभारणी मौजे तुरची ता. तासगांव येथील उजाड माळरानावर असलेल्या 25 हेक्टर सराकारी गायरान क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण भवन, वसतिगृहे, कॅडेट मेस, स्टाफ क्वाटर्स, प्रतिक्षालय, शॉपिंग प्लाझा व विश्रामगृह या सर्व इमारतींच्या बांधकामांना केंद्र सराकारच्या उर्जा विभागाकडील Green Rating for Integrated Habitat Assessment अर्थात “4 स्टार रेटींग अंडर गृह” या पुरस्काराने प्रशिक्षण केंद्रास सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस केंद्रातील सर्व इमारतींच्या नाविन्यपूर्ण बिल्डींग कन्स्ट्रक्श्नसाठी CIDC विश्वकर्मा अवॉर्ड 2011 या प्रशिक्षण केंद्रास बहाल करण्यात आला आहे.

प्रशिक्षण केंद्रामध्ये पवनचक्कीद्वारे वीजनिर्मीती, सौर दिवे, सोलर वॉटर हिटर, बायोगॅस, रेनवॉटर हॉरवेस्टींग, SIBF प्लान्टद्वारे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प्, गांडुळखत प्रकल्प्, शेततळे याद्वारे पोलीस प्रशिक्षण केंद्राचा Go- Green पर्यावरण पूरक परिसर विकसीत होवून Green PTC, Clean PTC हा नावलौकिक प्रशिक्षण केंद्रास प्राप्त झाला आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या श्रमदानातून प्रशिक्षण केंद्राच्या सिमा हद्दीलगत 3.5 कि.मी. लांबीचा Running Track तयार केला आहे. प्रशिक्षण केंद्र परिसरामध्ये सुमारे 6000 भारतीय प्रजातीच्या यज्ञवृक्ष/ आराध्यवृक्ष यांची लागवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रातील प्रियदर्शनी टेकडीवर अत्यंत दुर्मिळ अशा “नक्षत्रवन” प्रकल्पाची निर्मिती करून संपूर्ण परिसराचे नंदनवना मध्ये रुपांतर तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राने वनीकरण, पडीक जमीन विकास, व तद्संबधीची जनजागृती या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट् कामाबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्य् स्तरावरील “वृक्षमित्र” पुरस्कार देवून प्रशिक्षण केंद्राचा उचित गौरव केला आहे.

या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी दाखल होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थींना पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा यामध्ये उच्च् दर्जाची पारदर्शकता व गुणवत्ता राखण्याचा आटोकाट प्रयत्न् सातत्याने केला जात असून “भष्टाचार मुक्त् पोलीस केंद्र” ही ओळख या पोलीस प्रशिक्षण केंद्राने निर्माण केली आहे. संपूर्ण राज्यामध्ये रोल मॉडेल ठरावे अशा उच्च् प्रतीच्या या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रशिक्षणार्थी ज्ञानी, सौजन्य्शील, सर्वगुण संपन्न् व अष्टपैलु व्य्क्तिमत्वाची जडण-घडण होवूनच बाहेर पडेल याबद्दल मला दृढ विश्वास आहे.

प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा !